शिव ठाकरे (Shiv Thakare) नुकताच ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आला होता. त्याने या शोमध्ये येत स्पर्धकांना टास्क दिल्याचे पाहायला मिळाले. शिव ठाकरेने आतापर्यंत विविध रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला. बिग बॉस हिंदीच्या १६व्या पर्वात तो उपविजेता ठरला. ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील तो फायनलिस्टपैकी एक होता. तसेच शिव ठाकरे हा काही म्युझिक व्हिडीओंमध्येदेखील दिसला आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शिव ठाकरे प्रेक्षकांच्या संपर्कात असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो व व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. अनेकदा तो त्याच्या घरच्यांबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता त्याने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या आजीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आजी-नातवाचं बॉण्डिंग पाहून नेटकरी भारावले

शिव ठाकरेने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या आजीबरोबर दिसत आहे. आजी व नातवामधील प्रेम पाहायला मिळत आहे. शिवसह आजी वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका ठिकाणी आजी त्याला पैसेही देत असल्याचे दिसते. दोघे मंदिरात जातात. शेतात जातात. शेवटी सूर्यास्त होत असताना ते एका शांत ठिकाणी बैलगाडीत बसले असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी शिव आजीचे फोटो काढत आहे. आजी व शिव यांच्या चेहऱ्यावर निखळ आनंद पाहायला मिळत आहे. त्यांच्यात गप्पाही होत असल्याचे दिसत असून ते खळखळून हसताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओला मैं कोई ऐसा गीत गाऊँ हे गाणे लावले आहे.

शिव ठाकरेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सर्वांनी आजीचे कौतुक केले आहे. नेटकरी काय म्हणाले हे जाणून घेऊयात. एका नेटकऱ्याने लिहिले, “आजी इतकी क्यूट का आहे?”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आजीचं हसू म्हणजे सुख आहे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “क्यूट आजी”, एका नेटकऱ्याने लिहिले, “ज्या प्रकारे आजीने तुला पैसे दिले, तो अमूल्य क्षण होता.”

आणखी काही नेटकऱ्यानी कमेंट करीत दोघांसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. अनेकांनी आजी खूप गोड असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. “आजी, मनातला हळवा कोपरा”, “शिवचा जीव आहे आजी”, “तुम्ही दोघे खूप गोड आहात, असेच राहा”, “शिव भाऊ मला तुमची आजी बघितली की मला माझी आजी आठवते”, “ज्या मुलांना आजी-आजोबा आई-वडील, म्हातारे अशा लोकांबरोबर रहायला, फोटो काढायला, फिरायला आवडत नाही त्या लोकांसाठी शिव ठाकरे हे खूप उत्तम उदाहरण आहे, की तो आपल्या आजी-आईबरोबर चांगला वेळ घालवतो”, “शिव खूप प्रेम”, असे म्हणत नेटकऱ्यांनी आजी नातवाच्या जोडीचे कौतुक केले आहे.

दरम्यान, शिव ठाकरेला ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमात पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. त्याने आतापर्यंत प्रत्येक रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.