धाडसी, कोणालाही न घाबरणारी, कुटुंबासाठी कर्तव्य निभावण्यासाठी तप्तर असणारी अशी शिवा (Shiva)ची ओळख आहे. तिच्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ती प्रेक्षकांची लाडकी आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘शिवा’ ही मालिका वेगळ्या कथानकामुळे लोकप्रिय ठरताना दिसत आहे. शिवा जितकी बिनधास्त आहे, तितकाच आशू लाजरा, कमी बोलणारा असल्याचे दिसते. शिवाने आशूवर प्रेम असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, आशू दिव्याने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून शिवावर अविश्वास दाखवत असल्याचे पाहायला मिळते. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आशू शिवाला घराबाहेर काढणार

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आशूच्या गाडीवर काही गुंड हल्ला करतात. त्यावेळी शिवा मारामारी करत सर्वांना वाचवते. आशूची बहीण कीर्ती मारामारीतील एक फोटो तिच्या घरच्यांना दाखवते व म्हणते, “तुमच्यावर जो हल्ला झाला होता, तो या घरच्या लाडक्या सुनेनेच घडवून आणला होता. शिवा रडत म्हणते, “मी असं का करेन?” आशू तिला चिडून विचारतो, “फोटोमधील तो जो गुंड आहे, तो तुझ्या वस्तीतला आहे की नाही? शिवा म्हणते, “हो आहे.” आशू त्याच्या घरच्यांना म्हणतो, “आज ही ज्या थराला गेलीय ना, त्यात नवल काही नाही. शिवा आपल्या प्रेमासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. मला तुझं तोंडही बघायचं नाही, शिवा निघ तू.” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, शिवा तिच्या सासरच्या घरातून बाहेर पडत आहे. त्यावेळी ती मनातल्या मनात म्हणते, “आशू या प्रेमाची शपथ घेऊन सांगते तुला. तूच या घरात मला मानाने परत घेऊन येशील.

शिवा मालिकेचा प्रोमो शेअर करताना, “झालेल्या आरोपांमागील सत्य शिवा सर्वांसमोर आणू शकेल का…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, शिवाच्या वाढदिवशी आशू तिला त्याच्या मनातील भावना सांगण्यासाठी जात होता. तितक्यात दिव्या त्याच्या गाडीसमोर आली व तिने आशूच्या मनात शिवाविषयी गैरसमज निर्माण केले. त्यानंतर शिवा व आशूमध्ये दुरावा आला. शिवाने अनेकदा प्रयत्न करूनही आशू तिच्यावर विश्वास ठेवत नसल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: Allu Arjun Arrest: ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता शिवा तिच्यावरचे हे आरोप खोटे आहेत हे कसे सिद्ध करणार? शिवाने म्हटल्याप्रमाणे आशू पुन्हा तिला घरी कधी घेऊन जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.