Shivani Rangole : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी रांगोळी सध्या चांगलीच चर्चेत आहे. यामध्ये तिने अक्षरा हे पात्र साकारलं आहे. साधी, सुंदर आणि अत्यंत हुशार असलेली अक्षरा, भुवनेश्वरी म्हणजेच तिच्या सासूच्या डोळ्यात कायम खुपत असते. मुलगा अधिपती आणि अक्षराला वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीने एवढे दिवस अनेक प्रयत्न केल्याचं मालिकेत पाहायला मिळालं आहे. अक्षराच्या सासूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री कविता लाड- मेढेकर झळकल्या आहेत.

ऑनस्क्रीन अक्षरा आणि भुवनेश्वरी एकमेकींशी कितीही भांडल्या तरीही ऑफस्क्रीन त्यांच्यात फार सुंदर नातं आहे. याशिवाय शिवानीचं तिच्या खऱ्या आयुष्यातील सासूबाईंसाठी सुद्धा खूप गोड असं नातं आहे. शिवानी मृणाल कुलकर्णींना ‘ताई’ अशी हाक मारते. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याला अभिनेत्रीच्या ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन सासूबाई उपस्थित होत्या. यावेळी या तिघींनी मिळून फोटोशूट केलं. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा : Video : देवीचे चोरीला गेलेले दागिने सूर्याच्या बहिणीकडे सापडले आणि पोलीस…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?

शिवानी या फोटोला कॅप्शन देत म्हणते, “या दोन मैत्रीणी माझ्या आयुष्यात आहेत हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे. तुम्ही माझ्या बेस्ट फ्रेंड्स, मार्गदर्शक, गॉसिप पार्टनर आहात. तुमच्यासारखं शांत राहून निर्णय घेण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. तुम्हा दोघींना खूप प्रेम.”

शिवानीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. कविता मेढेकर या फोटोंवर कमेंट करत लिहितात, “मृणाल तुझं मला नेहमीच कौतुक आहे आणि हे फोटो खूपच सुंदर आहेत. यातल्या दुसऱ्या फोटोला परफेक्ट कॅप्शन द्यायचं असेल तर माझ्यामते मृणाल शिवानीचा हात धरून तिला म्हणतेय, ‘माझ्याजवळ घरी थांब’ आणि मी तिला म्हणतेय, ‘चल शूटिंग करुयात”

Shivani Rangole
शिवानी रांगोळे ( Shivani Rangole )

हेही वाचा : दिलीप कुमार यांना लग्नानंतर काही दिवसांनी ‘पहिलं प्रेम’ असलेल्या मधुबालाने भेटायला का बोलावलं होतं? ‘अशी’ होती सायरा बानोंची प्रतिक्रिया

हेही वाचा : ना सासूबाई, ना आई; शिवानी रांगोळे मृणाल कुलकर्णींना म्हणते ताई! दोघींचं नातं पाहून नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नेटकऱ्यांनी देखील या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर गेली दीड वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामध्ये शिवानी रांगोळे, कविता मेढेकर आणि हृषिकेश शेलार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.