‘बिग बॉस’ फेम सौंदर्या शर्मा ही सोशल मीडियावर आपल्या बेधडक वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतंच तिने अजय देवगण, शाहरुख खान व अक्षय कुमारबरोबर केलेल्या विमलच्या जाहिरातीबद्दल भाष्य केलं आहे. या जाहिरातीमध्ये सौंदर्या या तीनही सुपरस्टार्सबरोबर झळकली. यामुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोलही केलं. या जाहिरातीमुळे लोकांनी तिच्यावर टीकाही केली. नुकतंच तिने या ट्रोलर्सना परखड शब्दांत उत्तर दिलं आहे.

याविषयी मीडियाशी भाष्य करताना सौंदर्या म्हणाली, “ही जाहिरात माझ्यासाठी एक खूप मोठी संधी होती. शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार या सुपरस्टार्सबरोबर स्क्रीन शेअर करण्याची ही अभूतपूर्व अशी संधी मी कशी सोडणार होते? एक अभिनेत्री म्हणून मला ती संधी मिळत असेल तर मी ती का सोडावी? मी एक व्यक्ति आणि एक डेंटिस्ट आहे त्यामुळे तंबाखूसारख्या पदार्थांचं समर्थन मी नक्कीच करणार नाही. मी अशा प्रॉडक्टचं समर्थनही करत नाही. माझं मत आणि माझं प्रोफेशन या दोन भिन्न गोष्टी आहेत.”

आणखी वाचा : ‘डंकी’चं राष्ट्रपती भवनात खास स्क्रीनिंग, चित्रपट खरंच होणार टॅक्स फ्री? जाणून घ्या

पुढे सौंदर्या म्हणाली, “मी या जाहिरातीसाठी ऑडिशन दिली होती अन् ५०० मुलींमधून माझी निवड झाली होती. एक अभिनेत्री म्हणून मी फार उत्सुक होते अन् माझ्या करिअरमधील हा सर्वात मोठा असा क्षण होता. लोक ज्या गोष्टी वापरतात त्यांचे फायदे आणि नुकसान त्यांना ठाऊक असतं. त्यामुळे त्यांना त्यांचं भलं-बुरं सगळं ठाऊक असतं. एक कलाकार म्हणून तुम्ही त्यांच्या आवडीनिवडीवर एका मर्यादेपर्यंत प्रभास पाडता, त्यापलीकडे नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यंतरी ‘विमल पान मसाला’च्या जाहिरातीमध्ये अजय देवगण आणि शाहरुख खान पाठोपाठ अक्षय कुमारची एंट्री झाली होती. अक्षय कुमारला या जाहिरातीमध्ये पाहून बरेच लोक संतापले होते. यावरून त्यांनी अक्षयवर जबरदस्त टीकाही केली होती. यासाठी अक्षय कुमारला माफीदेखील मागावी लागली होती. यानंतरसुद्धा अजूनही अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खानची ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळत आहे.