सध्या मराठी वाहिन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. टीआरपीसाठी सुरू असलेल्या या स्पर्धेत वाहिन्या गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिकांच्या घोषणा करत आहेत. अशातच आता ‘स्टार प्रवाह’ने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘साधी माणसं’नंतर ‘स्टार प्रवाह’ने ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेचा दमदार पहिला-वहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ या सोहळ्याचं चित्रीकरण पार पडलं. यावेळी अभिनेत्री पूजा बिरारी व अभिनेता विशाल निकम एकत्र पाहायला मिळाले. तेव्हापासून ‘स्टार प्रवाह’वर या दोघांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा सुरू होती. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवठा केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांची कारवाई

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला विशाल आणि ‘स्वाभिमान’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी पूजा या नव्या मालिकेत राया व मंजिरीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये पूजा व विशाल यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अतिशा नाईक असे अनेक तगडे कलाकार मंडळी झळकले आहेत.

‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंकुश चौधरीने “वाह” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच “कडक”, “एक नंबर मालिका असणार आहे”, “कमाल”, “सुपर”, “लय भारी”, अशा अनेक प्रतिक्रिया कलाकार व चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: पहिल्यांदा दुसऱ्या लेकाला पाहताच सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांची होती ‘ही’ रिअ‍ॅक्शन; व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया व मंजिरी या मालिकेतील प्रमुख पात्र आहेत. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया व मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका आहे.