छोट्या पडद्यावरील मालिका या नेहमीच चर्चेचा विषय असतात. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांमध्ये सतत नवनवीन ट्विस्ट होतं असतात. पण काहीदा हे ट्विस्ट प्रेक्षकांमध्ये रोष निर्माण करतात. असं काहीस पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकबरोबर घडलं आहे.

हेही वाचा – Chandramukhi 2: कंगना रणौतला मोठा झटका; ‘चंद्रमुखी २’ प्रदर्शित होताच झाला लीक, कमाईवर होणार परिणाम?

मागील महिन्यात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या एका प्रोमोवर प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ‘काय फालतूगिरी लावली आहे’, ‘आता खूपच अती झालंय’ अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता पुन्हा एकदा याच मालिकेचा नवा प्रोमो पाहून ‘मालिका बंद करा’, ‘एकदाच काय तो जीव घ्या गौरीचा आणि संपवा ही मालिका’, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा – “आयुष्याची काही वर्ष…” लतादीदींसाठी अभिजीत केळकरनं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष; म्हणाला…

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये शालिनीचा पर्दाफाश होताना दाखवण्यात आलं आहे. प्रोमोमध्ये सर्वजण शालिनीचा वाढदिवस साजरा करताना दाखवले आहेत. पण तितक्यात जयदीप आणि गौरी येते आणि म्हणतात की, “आम्ही दोघांनी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे.” त्यानंतर एक व्हिडीओ क्लिप दाखवली जाते. ज्यामध्ये शालिनी म्हणते की, “मला तुझा नाही तर जयदीप आणि गौरीच्या रक्ताने हात माखायचे आहेत.” हे पाहून माई शालीना धडा शिकवतात. त्या म्हणतात की, “आजपासून तुझ्यासमोर जेव्हा जयदीप आणि गौरी येतील तेव्हा गुडघ्यावर बसून नाक घासून त्यांची माफी मागायची.” यावेळी शालिनीच्या गळ्यात माई एक पाटी घालतात. ज्यावर “घराशी बेईमानी करणारी, मी एक नालायक सून” असा मजकूर लिहीलेला पाहायला मिळत आहेत. मालिकेचा हाच नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले आहेत.

हेही वाचा –“तुम्ही आहातच इथे…” लतादीदींसाठी सलील कुलकर्णी यांची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाले…

एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “निरुपयोगी मालिका…एकच गोष्ट घासत आहे. काहीच नवीन नाही.” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “या आधीपण तिचे गुन्हे सिद्ध झाले होते… काय झालं? काही नाही..ती घरात राहून खुलेपणाने कारस्थान करतं आहे..त्यामुळे मी ७ महिन्यांपूर्वी ही मालिका बघणं बंद केलं आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “दिग्दर्शकाला विनंती आहे की, ही मालिका बंद करा. यापेक्षा अजून एक चांगली मालिका दाखवा. मी तर ही मालिका बघायची बंद केली आहे.”

हेही वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच होणार बंद?; ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’वर लवकरच ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तसेच अक्षर कोठारीची नवी मालिका भेटीस येणार असल्याचं निश्चित झालं आहे. पण ही नवी मालिका कधी सुरू होणार? आणि कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे येत्या काळातच समजेल.