‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’ ही मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या मालिकेमधील कलाकारांनाही बरीच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे जुही परमार. जुही व अभिनेता सचिन श्रॉफ यांनी खऱ्या आयुष्यात एकमेकांशी लग्न केलं. मात्र आठ वर्ष सुखी संसार केल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. आता सचिन त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे.
आणखी वाचा – Video : …अन् भर पार्टीत जमिनीवर बसून रणबीर कपूरचा भन्नाट डान्स, ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सचिन सध्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमध्ये तारक मेहता ही भूमिका साकारत आहे. शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर सचिनला तारक मेहताच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं. आता सचिन दुसरं लग्न करण्यास तयार झाला आहे. २०१८मध्ये जुही व सचिन विभक्त झाले.
आता २५ फेब्रुवारीला मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीमध्ये सचिनचा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. सचिनची होणारी पत्नी ही त्याच्या बहिणीची मैत्रीण आहे. सचिनच्या कुटुंबियांनीही त्याच्या या लग्नासाठी होकार दिला आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, सचिनचं हे लग्न अॅरेंज मॅरेज आहे.
कलाक्षेत्राशी त्याच्या होणाऱ्या पत्नीचा कोणताच संबंध नाही. ती एक इवेंट मॅनेजर तसेच इंटेरियर डिझायनर म्हणून काम करते. २००९मध्ये सचिनने जुहीशी लग्न केलं होतं. पण जुहीचं माझ्यावर प्रेम नसल्याचं सचिनने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. याच कारणामुळे हे दोघं एकमेकांपासून विभक्त झाले. सचिनला एक मुलगीही आहे. वयाच्या ५०व्या वर्षी सचिनने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.