टीव्ही जगतात कायमच नवनव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतात. सध्या टीव्ही जगतात ‘अनुपमा’, ‘कौन बनेगा करोडपती’, ‘कपिल शर्मा शो’ या मालिका सर्वाधिक लोकप्रिय आहेत. मात्र टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा ‘तारक मेहता’ मालिकेने बाजी मारली आहे.

औरमॅक्स यांच्या अहवालानुसार रुपाली गांगुली यांच्या ‘अनुपमा’ मालिकेला मागे टाकत ‘तारक मेहता’ मालिकेने नंबर १चा मान पटकवला आहे. मालिकेतील अनेक लोकप्रिय भूमिका साकारलेल्या कलाकारांनी मालिका जरी सोडली असली तरी मालिकेने आपले अव्वल स्थान जपले आहे. अनुपमा मालिका दुसऱ्या क्रमांकावर तर गेल्या १३ वर्षांपासून सुरु असलेली ‘ये रिश्ता क्या केहलता है’ मालिका तिसऱ्या क्रमांवर आहे.

“धर्मेंद्रच सिनियर बाकी अमिताभ…” इंडस्ट्रीमधील अनुभवावर सचिन पिळगावकरांनी केलं भाष्य

अमिताभ बच्चन यांचा सदाबहार कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाला टीआरपीच्या शर्यतीत चौथे स्थान मिळाले आहे. कपिल शर्माचा विनोदी कार्यक्रम पाचव्या स्थानावर आहे. वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’ला सहावे स्थान मिळाले आहे. सलमान खान या कार्यक्रमात होस्टच्या भूमिकेत दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तारक मेहता गेली कित्येक वर्षं ही मालिका सुरू आहे. यातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. दिवसागणिक या मालिकेचा चाहतावर्ग वाढतानाच दिसत आहे. सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर ही मालिका भाष्य करत असल्याने ही मालिका प्रेक्षक आवर्जून बघतात. जेठालाल आणि दया भाभी हे मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र आहे.