छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून अमित भानुशालीला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या अमित स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. गेल्या वर्षभरापासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेमुळे अमितचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

अमित भानुशालीने त्याच्या युट्यूब चॅनेलवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने अलीकडेच नवीन घर खरेदी केलं. अमितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चाहत्यांना अभिनेता त्याच्या जुन्या घरातून सामान शिफ्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “कमी वयात सोडून गेली”, पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटपासून अजित पवार अनभिज्ञ, भर सभेत व्यक्त केलं दु:ख

अमित त्याच्या नव्या घराची झलक लवकरच सोशल मीडियावर शेअर करणार आहे. असं त्याने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेता लिहितो, “नव्या घरात आपलं संपूर्ण सामान शिफ्ट करताना खरंच खूप तारेवरची कसरत होते. पण, हा सगळा ताण असताना माझ्या लेकाचं म्हणजेच हृदानचं एक हास्य पाहून मन प्रसन्न होतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये एक नवीन उर्जा निर्माण होते.”

हेही वाचा : “प्रिय नवरोबा…”, रितेश-जिनिलीयाच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण! देशमुखांच्या सुनेने शेअर केली खास पोस्ट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लवकरच आम्ही नव्या घरात शिफ्ट होऊ. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या कुटुंबाच्या कायम पाठीशी ठेवा. सगळ्यांना भरभरून प्रेम!” असं अमितने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. दरम्यान, आता अमितच्या सगळ्या चाहत्यांमध्ये त्याचं नवीन घर पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या त्याचे सगळे चाहते अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.