Lakshmichya Pavalani Fame Akshar Kothari Wedding Photos : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षर कोठारी २० जूनला विवाहबंधनात अडकला. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत त्याने सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला. अक्षर सध्या ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये अद्वैत चांदेकर ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

अक्षरच्या पत्नीचं नाव सारिका खसणीस असून त्याने लग्नानंतर सोशल मीडियावर सुंदर पोस्ट शेअर केली आहे. “आधीही तूच, आताही तूच आणि आता कायमस्वरुपी तूच… बचपन का प्यार” असं कॅप्शन देत अक्षरने लग्नाचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय अभिनेत्याने या पोस्टवर ‘#SaAkshar’ ( सारिका अक्षर ) असा हॅशटॅगही वापरला आहे. अभिनेत्याने सारिकाविषयी लिहिताना ‘फर्स्ट क्रश’, ‘फर्स्ट लव्ह’ असाही उल्लेख पोस्टच्या कॅप्शनमध्ये केला आहे.

अक्षरच्या लग्नसोहळ्यात ‘ठरलं तर मग’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री उपस्थित होत्या. या मालिकेत प्रतिमा किल्लेदारची भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा नवलकर अक्षर-सारिकाच्या लग्नात सहभागी झाल्या होत्या. लग्नसोहळ्यातील इनसाइड फोटो सोशल मीडियावर शेअर करत शिल्पा नवलकरांनी अक्षर-सारिकासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

शिल्पा नवलकर अक्षरला कोठारीला लग्नाच्या शुभेच्छा देत लिहितात, “अक्षर-सारिका मी तुम्हा दोघांसाठी खूप जास्त आनंदी आहे. तुम्हाला खूप प्रेम आणि शुभेच्छा… मी तुम्हा दोघांबरोबर कायम आहे.” या पोस्टवर अक्षरने “लव्ह यू शिल्पा…” असा रिप्लाय दिला आहे. याशिवाय सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून अक्षरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षरने लग्न सोहळ्यात ऑफ व्हाइट रंगाचा सूट घातला होता. तर, त्याच्या पत्नीने अबोली रंगाची सुंदर अशी साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, अक्षरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्याने आजवर ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’, ‘छोटी मालकीण’, ‘चाहूल’, ‘कमला’ अशा अनेक लोकप्रिया मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सध्या अभिनेता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.