‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’चं दुसरं पर्व २१ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सर्वांचा लाडका होस्ट सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. ‘स्टार प्रवाह’च्या परिवारात नव्याने सामील झालेल्या सदस्यांबरोबर यंदाचं पर्व नव्या जोशात रंगणार आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ‘आता होऊ दे धिंगाणा’चं पहिलं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं. हे पहिलं वहिलं पर्व चांगलंच लोकप्रिय ठरलं. या पहिल्या पर्वातील साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या सुपरहिट ठरल्या. त्यामुळे दुसऱ्या पर्वातही या फेऱ्या पाहायला मिळणार आहेत. दोन मालिकांच्या टीममधली सांगितिक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच. पण त्याबरोबर भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती-जमतीही या मंचावर उलगडणार आहेत.

हेही वाचा – ईशा केसकर नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘हे’ कलाकारही झळकणार, पाहा प्रोमो

‘आता होऊ दे धिंगाणा’च्या दुसऱ्या पर्वातील पहिल्याच भागात ‘स्टार प्रवाह’वरील दोन लोकप्रिय मालिकांमध्ये सांगितिक लढत पाहायला मिळणार आहे. ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील कलाकार पहिल्याच दिवशी धिंगाणा घालताना दिसणार आहेत. याचा जबरदस्त प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला कोणते जंक फूड्स आवडतात? जाणून घ्या…

हेही वाचा – “आईचे दागिने, मैत्रिणीचे कपडे अन्…”, घराचा EMI भरण्यासाठी केतकी माटेगावकरने केली अशी बचत; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप दिवस झाले काहीतरी मीस झालं होतं.. पण आता स्टार परिवार प्रत्येकाला हसवेल…”, “खूप उत्सुक आहे”, “जुई आणि तेजश्रीचा ड्रामा पाहायला खूप आवडेल”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत.