गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. मोठ्या थाटामाटात लग्न करून कलाकार आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहेत. अभिनेता प्रथमेश परबनंतर २६ फेब्रुवारीला अभिनेत्री तितीक्षा तावडे लग्नबंधनात अडकली. अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर तितीक्षाने लग्नगाठ बांधली. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा तितीक्षा व सिद्धार्थचा पार पडला. लग्नाच्या सात दिवसांनंतर अभिनेत्री आता कामावर परतली आहे.

अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तितीक्षाने साकारलेली नेत्राची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच तिची ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दरम्यान, लग्नाच्या निमित्ताने तितीक्षा काही दिवसांच्या सुट्टीवर होती. पण आता लग्नाच्या सात दिवसांनी ती कामावर परतली आहे. मालिकेतील इतर अभिनेत्रींनी तिचं सेटवर स्वागत केलं.

हेही वाचा – Video: “महागडे गिफ्ट्स, चॉकलेट्स अन्…”, प्रथमेश परबने ‘असा’ साजरा केला बायकोचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री एकता डांगरने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर तितीक्षाचं सेटवरील स्वागताचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये केक कापून तितीक्षाचं स्वागत करताना इतर अभिनेत्री पाहायला मिळत आहेत. यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अमृता सकपाळ रावराणे, सुरुची अडारकर दिसत आहेत.

हेही वाचा – Video: आता खऱ्या अर्थाने ‘प्रेमाची गोष्ट’ होणार सुरू, सागर मुक्ताला करणार प्रपोज!

दरम्यान, तितीक्षाच्या आधी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अद्वैत म्हणजे अभिनेता अजिंक्य ननावरेचं लग्न झालं. अभिनेत्री शिवानी सुर्वेबरोबर अजिंक्यने लग्नगाठ बांधली.