झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. गेल्या वर्षभरापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. तसंच या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अक्षरा आणि अधिपतीच्या जोडीचीदेखील चाहत्यांना भुरळ पडलीय.

अक्षरा आणि अधिपती म्हणजेच शिवानी रंगोळे आणि ऋषिकेश शेलारचा ऑनस्क्रीन सारखाच ऑफस्क्रीन बॉन्डदेखील अगदी खास आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. मालिकेच्या सेटवरील धम्माल-मस्ती आणि रिल्स दोघंही चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच दोघांचा आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हेही वाचा… VIDEO: “वहिनी म्हणतील…”, रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

सध्या ‘पुष्पा-२’ या चित्रपटातील ‘अंगारो का’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. या ट्रेंडिंग गाण्यावर अनेक मराठी कलाकार थिरकले आहेत. आता हा ट्रेंड ऋषिकेश आणि शिवानीनेदेखील फॉलो केला आहे. “अंगारो का…” या गाण्यावर आता अधिपती-अक्षरा थिरकले आहेत. या डान्सचा व्हिडीओ शिवानीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

या गाण्यासाठी दोघांनी खास मॅचिंग आउटफिट्सची निवड केली आहे. शिवानीने काळ्या रंगाचं जॅकेट आणि निळी जीन्स परिधान केली आहे, तर ऋषिकेशने मॅचिंग शर्ट आणि जीन्सची निवड केलीय. दोघंही या गाण्याची हुक स्टेप करत थिरकताना दिसतायत.

हेही वाचा… Fathers Day: नुकत्याच बाबा झालेल्या वरुण धवनने शेअर केला लेकीबरोबर खास फोटो, म्हणाला, “मुलीचा बाबा…”

“खूप साऱ्या प्लॅनिंगनंतर आणि ब्लूपर्सनंतर अखेर व्हिडीओ शूट झाला”, असं कॅप्शन शिवानीने या व्हिडीओला दिलंय. शिवानीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनीदेखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “फ्लॉवर नही फायर है ये”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अधिपती आणि अक्षरा ही माझी आवडती जोडी आहे”, तर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… …म्हणून सोनाक्षी सिन्हाबरोबर झाला होता ब्रेकअप? अर्जुन कपूरने केला खुलासा; म्हणाला, “काही नाती…”

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. नुकतीच अक्षराने तिच्या प्रेमाची कबूली अधिपतीला दिलीय. आता कुठे दोघांमधलं नात फुलायला सुरूवात झालीय. आता यात भुवनेश्वरी नवा कट काय रचणार हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेत शिवानी आणि ऋषिकेशसह कविता लाड, ऋता काळे, विरीशा नाईक, स्वप्नील राजशेखर, दिप्ती सोनावणे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.