टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला गळफास घेत आत्महत्या केली आणि मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा धक्का बसला. तुनिषाच्या आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे या प्रकरणात तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानवर गंभीर आरोप करण्यात आलेत. शिझानला अटक करून रविवारी कोर्टासमोर हजर केलं, त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण आता या प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माच्या नातेवाईकांनी ‘एएनआय’शी बोलताना तिचा कथित बॉयफ्रेंड शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझान तुनिषाला डेट करत असताना इतर मुलींच्याही संपर्कात होता. तो तुनिषाशी कमिटेड नव्हता त्यामुळे तुनिषा तणावात राहायची. १५ दिवसापूर्वीच शिझान आणि तुनिषा यांचं ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषा पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये गेली.

आणखी वाचा-“त्या मालिकेच्या सेटवर मला…” सिने असोसिएशनच्या अध्यक्षांनी वर्तवला संशय; तुनिषाच्या आत्महत्येच्या SIT चौकशीची मागणी

तुनिषा आणि शिझान यांच्या ब्रेकअपनंतर तिला याचा मोठा धक्का होता. ‘इंडिया टीव्ही’च्या वृत्तानुसार १० दिवसांपूर्वीच तुनिषाला एंग्जायटी अॅटॅक आला होता. १६ डिसेंबरला तुनिषाला शिझान इतर मुलींशी संपर्क ठेवून आपली फसवणूक असल्याचं समजल्यानंतर ती खूप पॅनिक झाली होती आणि त्याचवेळी तिला एंग्जायटी अ‍ॅटॅक आल्याची माहिती तिच्या काकांनी दिली आहे. “शिझानने आपल्याला दुसरं कोणीतरी आवडत असून तिच्याशी नात्यात असल्याने तुझ्याशी नातं तोडत आहे असं कारण देत तुनिषाशी ब्रेकअप केलं होतं.” असंही तिचे काका पवन शर्मा म्हणाले आहेत.

आणखी वाचा- तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला कोठडी, श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू अन्…; गेल्या २४ तासात नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सध्या सब टीव्ही मालिका ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये तुनिषा राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.