छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखला जाणारा ‘बिग बॉस’ नेहमी चर्चेत असतो. या शोमधील कलाकार मंडळी देखील तितकेच चर्चेत असतात. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील स्पर्धेक सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. बिग बॉस घरातील आठवणी ताज्या करत आहेत. किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर यांच्यानंतर आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ‘बिग बॉस मराठी’च्या आठवणीत रमली आहे.

हेही वाचा- Soha Ali Khan Birthday: वडिलांच्या भीतीमुळे बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण, असा आहे सोहा अली खानचा प्रवास

तेजस्विनीने काही फोटो शेअर करत लिहीलं की, “बिग बॉस ४च्या संगी, मिळाल चाहत्यांच प्रेम अफाट, नवं ध्येय आणि प्रबुद्ध मन घेवूनी, तेजस्विनीनी धरली यशाची वाट…..बिग बॉस मराठी सीझन ४, इतर कोणत्याही रिअ‍ॅलिटी शोप्रमाणे सुरू झालेला एक अध्याय. माझ्यासाठी जीवन बदलून टाकणाऱ्या मैलाच्या दगडासारखा आहे. एक वर्ष उलटून गेलं, तरीही त्याचा प्रभाव माझ्या हृदयात अगदी भित्तिचित्रेसारखा कोरला गेला आहे.”

“माझ्या बिग बॉसच्या प्रवासानंतर, माझ्या चाहत्यांच प्रेम लक्षणीयरित्या वाढलं आणि त्यांच्याकडून मिळालेलं प्रेम इतके निरागस आहे जशी की मी त्यांचा कुटुंबाची एक सदस्य आहे आणि ते सगळे माझी ऐवढी काळजी घेतात, यासाठी मी सदैव ऋणी आहे. बिग बॉसच्या दरम्यान आणि नंतर बनलेला हा चिरस्थायी बंध आता काळाच्या ओघात मजबूत होत राहणार, हे नक्कीच. बिग बॉसच्या प्रवासातून मिळालेल्या प्रत्येक अनुभवाबद्दल मी कृतज्ञ आहे. अजून खूप काही बोलायचं आहे पण काही गोष्टींचा गोडवा त्या मनात साठवून ठेऊन जास्त वाढतो, ” असं लिहीत तेजस्विनीने ‘बिग बॉस’च्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेला झाला मोठा आनंद, कारण…

हेही वाचा – Video: अखेर क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींची पहिली झलक समोर; अभिनेत्रीने शेअर केला गोड व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, . ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘गुलदस्ता’ यांसारख्या चित्रपटातून ती घराघरात पोहोचली. खरंतर तेजस्विनी ‘बिग बॉस मराठी’मुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर ती मालिका आणि चित्रपटांमध्ये अधिक पाहायला मिळाली. अलीकडेच तिचा ‘अफलातून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये दिसत आहे.