‘बिग बॉस’ फेम शालिन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी दलजित कौरने काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं. दलजितने निक पटेलसह लग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. दलजित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आज जागतिक भावंड दिवस(Sibling Day) निमित्त दलजीतने इन्स्टाग्रामवरुन तिच्या बहिणींबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे.

दलजीतने बहिणींबरोबरचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. “ज्यांच्याशी सगळ्यात जास्त मस्ती करते…त्यांनी माझं कौतुक केलं म्हणजे मी यशस्वी झाले…त्यांच्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य खर्ची करू शकते…माझ्या दोन बहिणी…त्या बहिणी नसून माझी आई व भाऊ आहेत. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मी आयुष्याभर तुम्हाला त्रास देत राहीन, कारण मी सगळ्यात छोटी आहे, लव्ह यू रोजी दाद, लव्ह यू गोल्डी दादा” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> “…म्हणूनच नवऱ्याने सोडलं असेल”, ‘स्टार प्रवाह’वरील नवी मालिका चर्चेत; ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

दलजीत कौरच्या दोन्ही बहिणी लष्करात आहेत. अमृत कौर ग्रोवर व जतिन्दर कौर अशी तिच्या बहिणींची नावं आहेत. दलजितचे वडिलही लष्कर अधिकारी होते. भारतीय लष्करात कर्नल पद भूषविलेले दलजितचे वडील सेवा निवृत्त आहेत.

हेही वाचा>> “मी मामावर खूप प्रेम करतो, पण…” गोविंदाबरोबरच्या वादावर कृष्णा अभिषेकची प्रतिक्रिया, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘स्वरागिनी’, ‘काला टिका’, ‘कयामत की रात’ अशा अनेक मालिकांमध्ये दलजीतने काम केलं आहे. २००९ मध्ये तिने अभिनेता शालीन भानोतशी लग्नगाठ बांधली होती. त्यांना जेडन हा मुलगाही आहे. २०१५मध्ये शालीन व दलजीत घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यानंतर आता १८ मार्चला पुन्हा विवाहबंधनात अडकून दलजीतने नव्याने संसार थाटला आहे.