छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून शिवाली परबला ओळखले जाते. नुकतंच तिच्या एका सहकलाकाराने तिच्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
शिवाली परब आणि विशाल राठोड यांची मुख्य भूमिका असलेले नवेकोरे मराठी अल्बम साँग ‘म्याड केलंय तू’ हे काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाले. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच हिट ठरताना दिसत आहे. विशालने यानिमित्ताने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने शिवालीचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा
विशाल राठोडची पोस्ट
“मला सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली, यासाठी मी खरंच खूप आभारी आहे. शिवाली परब…. महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील नावाजलेली मोठी कलाकार सोबत काम करणार, आधी तर रात्रभर झोप नाही लागली की उद्या एवढ्या मोठ्या आर्टिस्ट समोर आपण कस टिकू, काय होईल? त्या कश्या वागतील??
पण सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिच्या स्वभावात लगेच मिळाली, सगळ्यांना समजून घेणारी, केअर करणारी, प्रोजेक्ट चांगला व्हावा म्हणून आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून, जीव तोडून काम करणारी कलाकार मी पहिली!
Insta ची एक रिल् viral झाली तरी attitude दाखवणाऱ्या अनेक पहिल्या, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवून सुद्धा जमिनीवर पाय असणारी आर्टिस्ट मला पहायला मिळली, खूप काही शिकवून आणि mad करून गेली! धन्यवाद शिवाली परब, खूप खूप प्रेम. Thank you Team तुम ना होते तो ये सब ना होता !”, असे विशाल राठोडने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “आम्ही आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली आहे”, हेमांगी कवीचे बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाली “ते केल्यामुळेच…”
शिवाली परब आणि विशाल राठोड यांचे ‘म्याड केलंस तू’ हे गाणं चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्यातून प्रेमाची परिभाषा मांडण्यात आली आहे. सध्या या गाण्याची तरुणाईला भुरळ पडली आहे. व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित झाले आहे