Paaru Upcoming Twist: मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत असतात. आपल्या आवडत्या मालिकेत काय होणार, याबाबत नेहमीच प्रेक्षकांना जाणून घ्यायचे असते. आता पारू मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

‘पारू’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे पारू आदित्यच्या प्रेमात पडली आहे. ती त्याला तिचा पती मानते. त्याच्यासाठी अनेक गोष्टी करते. आता आदित्यदेखील तिच्या प्रेमात पडला आहे. त्या दोघांच्या नात्याबद्दल, ते एकमेकांवर प्रेम करतात याबद्दल प्रीतम,प्रिया, सावित्री आत्या, मारुती यांना माहित आहे. मात्र, मारुतीला हे नाते मान्य नाही.

ज्या घरात वर्षानुवर्षे काम केले, त्यांच्याशी स्वामीनिष्ठ असायला हवे. गरीब म्हणून कोणी त्याच्यावर कोणी आरोप करू नये, असे मारुतीला वाटते. तसेच किर्लोस्कर घराणे हे मोठे, श्रीमंत असून त्यांचा दर्जाही मोठा आहे. त्यामुळे पारूने श्रीमंत किर्लोस्कर कुटुंबातील आदित्यवर प्रेम करून मोठा गुन्हा केल्याचे मारुतीला वाटते. याच विचारातून त्याने पारूला खि‍रीतून विष खाऊ घातले होते. जेव्हा हे आदित्यला समजले तेव्हा त्याने तिला लगेचच दवाखान्यात दाखल केले होते.

पारू व आदित्यबद्दल दामिनी करणार खुलासा

दवाखान्यात दाखल केल्यानंतर तो पारूचे नाव सांगताना त्याने पार्वती आदित्य किर्लोस्कर असे सांगितले होते. आता याचा खुलासा दामिनी सर्वांसमोर करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की पारू व आदित्य किचनमध्ये असून ते एकमेकांच्या जवळ आहेत. तितक्यात दामिनी येते. ती त्या दोघांना एकत्र पाहते. दामिनी स्वत:च म्हणते की “आता मजा करू देत. कारण- लैला मजनूच्या स्टोरीचा हा शेवटचा सीन आहे.

पुढे पाहायला मिळते संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब एकत्र आहे. तिथे पारू आणि मारुतीदेखील आहे. त्याचवेळी दामिनी सर्वांना सांगते की जेव्हा पारूला दवाखान्यात भरती केले होते, तेव्हा आदित्यने हिचं नाव पार्वती आदित्य किर्लोस्कर असे सांगितले होते. दामिनीच्या बोलण्यानंतर अहिल्यादेवीच्या चेहऱ्यावर रागाचे भाव दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “पारू आणि आदित्यबद्दल दामिनी अहिल्यादेवीला सांगणार”, अशी कॅप्शन दिली आहे. आता अहिल्यादेवी दामिनीवर विश्वास ठेवत आदित्यला जाब विचारणार का, मारुती पारु व आदित्यला वेगळे करण्यासाठी काय करणार, आदित्य त्याचे पारुवर प्रेम आहे, हे कधी सांगणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.