scorecardresearch

नोरा फतेहीच्या प्रेमात होता टेरेंस? रिलेशनशिपच्या चर्चांबाबत कोरियोग्राफरने सोडलं मौन

नोरा फतेही आणि कोरियोग्राफर टेरेंस लुईस यांच्या नात्यामध्ये नक्की काय शिजतंय? याबाबत आता टेरेंसने खुलासा केला आहे.

terence lewis nora fatehi dance, terence lewis nora fatehi relationship
नोरा फतेही आणि कोरियोग्राफर टेरेंस लुईस यांच्या नात्यामध्ये नक्की काय शिजतंय? याबाबत आता टेरेंसने खुलासा केला आहे.

अभिनेत्री नोरा फतेहीच्या लुक, स्टाइल अन् डान्सचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक लुकमध्ये नोरा अगदी उठून दिसते. पाहता क्षणीच कोणीही प्रेमात पडेल असाच तिचा लुक आहे. बॉलिवूडमधील टॉप तरुण अभिनेत्रींमध्ये नोराही आहे. नोरा तिच्या खाजगी आयुष्यामुळे फारशी चर्चेत आली नसली तरी कोरियोग्राफर टेरेंस लुईसबरोबर तिचं नातं घट्ट आहे. छोट्या पडद्यावरील डान्स रिअॅलिटी शोसाठी हे दोघं एकत्र आले होते. यावेळी नोरा-टेरेंसमधील मैत्रीचं घट्ट नातं दिसून आलं. तिथपासूनच नोरा-टेरेंस एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला.

आता टेरेंसने नोराबरोबर असलेल्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टेरेंसने नोराची स्तुती देखील केली. नोराबरोबर असलेल्या रिलेशनशिपबाबत टेरेंसला विचारला असता तो म्हणाला, “रहस्य हे रहस्यच राहू द्या. आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिणी आहोत.” तसेच टेरेंसने तिची स्तुती देखील केली. “ऑनस्क्रिन आमची केमिस्ट्री फार सुंदर आहे. मला तिची एनर्जी फार आवडते.” असे तो म्हणाला.

आणखी वाचा – VIRAL VIDEO : सोहेल खानच्या चेहऱ्याची अशी अवस्था का झाली? बदलता लुक पाहून व्हाल हैराण

टेरेंसला नोराचं काम फार आवडतं. ती उत्तम डान्सर तर आहेच पण त्याचबरोबरीने ती फार मेहनती आहे, जे तिच्या डोक्यात असतं तेच ती बोलते. ती खूप प्रेमळ असल्याचं टेरेंसचं म्हणणं आहे. “आम्ही काही एकमेकांना नेहमी फोन करत नाही किंवा मी हे देखील म्हणणार नाही की आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. पण आमचं रिलेशनशिप हेल्दी आहे एवढंच मी सांगू शकतो.” असं म्हणत त्याने आपल्या रिलेशनशिपबाबत स्पष्टीकरण दिलं.

आणखी वाचा – गालावर हात फिरवला, मिठी मारली अन् म्हणाली….शहनाज-सलमानचा व्हिडीओ होतोय VIRAL

नोराने जेव्हा डान्स रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती तेव्हा तिचं नृत्य पाहून टेरेंसने तिचं कौतुक केलं होतं. तसेच दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एकमेकांसोबतचे डान्स व्हिडीओ शेअर केले होते. आता टेरेंसने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सध्यातरी या दोघांच्या नात्याबाबत होणाऱ्या चर्चांना फुलस्टॉप लागणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terence lewis on his relationship with actor nora fatehi and reveals if he ever dated or not kmd

ताज्या बातम्या