Thamma Box Office Collection Day 1 : आयुष्मान खुरानाचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘थामा’ दिवाळीत प्रदर्शित झाला. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने सर्वत्र उत्साह निर्माण केला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
२१ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतर अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.
मॅडॉक फिल्म्सच्या ‘थामा’ चित्रपटाची क्रेझ मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. चित्रपटसृष्टीत चित्रपटाचे यश बहुतेकदा त्याच्या कलेक्शनवरून मोजले जाते. विशेषतः पहिल्या दिवसाची कमाई चित्रपटाची करोडोंच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची क्षमता दर्शवते. आयुष्मान खुरानाच्या ‘थामा’ चित्रपटाला जोरदार सुरुवात मिळाली.
‘थामा’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
आयुष्मान खुराना प्रत्येक भूमिका परिपूर्णतेने कशी साकारायची हे जाणतो. अलीकडच्या रिलीज झालेल्या चित्रपटांच्या तुलनेत आदित्य सरपोतदार यांच्या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. ‘थामा’ध्ये आयुष्मान एका व्हँपायरची भूमिका साकारत आहे आणि या भूमिकेतून त्याने पुन्हा एकदा चाहत्यांना त्याच्या कामाने प्रभावित केले आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘थामा’ने पहिल्या दिवशी २४ कोटी कमावले. येत्या काळात त्याचे कलेक्शन झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा ‘एक दीवाने की दीवानियत’ हा चित्रपटदेखील मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याची टक्कर आयुष्मान खुराना व रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ चित्रपटाशी झाली.
‘थामा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात केली आणि या रोमँटिक ड्रामा चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवरही चांगली सुरुवात केली. चला जाणून घेऊया ‘एक दीवाने की दीवानियत’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली ते. हर्षवर्धन राणेच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.५० कोटींची कमाई केली आहे.