scorecardresearch

“श्रीकांत आणि सूचीमध्ये येऊ नको नाही तर…”; ‘द फॅमिली मॅन’मुळे शरद केळकरला जीवघेणी धमकी

शरद केळकरने शोमधील सूची म्हणजेच अभिनेत्री प्रियामणि सोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.

sharad-kelkar-the family-man
(Photo-instagram@sharadkelkar)
‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली आहे. या वेब शोमधील श्रीकांत तिवारी असो किवा राजी आणि जेके प्रत्येकाला चाहत्यांनी मोठी पसंती दिली. या वेब शोमधील अनेक कलाकार शोसंबंधीत अनेक आठवणी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच या शोमधील अरविंदने म्हणजेच अभिनेता शरद केळकरने शोमधील सूची म्हणजेच अभिनेत्री प्रियामणि सोबतचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. यात दोघही कॅमेरात पाहून पोझ देताना दिसत आहेत. पहिल्या सिझनमध्ये अरंविंद आणि सूचीमध्ये जवळीक निर्माण झाल्याची एक हिंट मेकर्सने दिली होती.

या वेब शोमध्ये अरविंद आणि सूचीमध्ये प्रेमाचं नात दाखवण्यात आलं नसलं. तरी त्यांची मैत्री श्रीकांत प्रमाणेच चाहत्यांना देखील खटकलेली दिसतेय. यामुळे अरविंदला म्हणजेच अभिनेता शरद केळकरला आता धमक्या येऊ लागल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शरद केळकरने या गोष्टीचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “मला सोशल मीडियावर रोज धमक्यांचे मेसेज येऊ लागले आहेत. यात अनेक जण सूची आणि श्रीकांतच्या मध्ये येऊ नको नाहीतर जीवे मारू अशा धमक्या येत आहेत.” असं शरद केळकर म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

हे देखील वाचा: “आता फातिमासोबत शुभमंगल”, आमिर खानच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

‘द फॅमिली मॅन’ च्या पहिल्या सिझनपासूनच सूची आणि अरविंदची मैत्री दाखवली आहे. ते एकत्र काम देखल करत होते. मात्र पहिल्या सिझनमध्ये अरविंद आणि सूची लोणावळ्यात एका कामानिमत्त गेले असता काही कारणांमुळे त्यांना तिथेच राहवं लागतं. त्या रात्री नेमकं काय घडलं हे शोमध्ये दाखवण्यात आलं नसलं. तरी त्या ट्रीपनंतर सूची नोकरी सोडते. त्यामुळे त्या रात्री नेमकं काय घडलं असा प्रश्न देखील चाहत्यांना पडला आहे. दरम्यान पहिल्या सिझनमध्ये श्रीकांतला देखील अरविंद आणि सूचीवर संशय आल्याने तो त्यांचा गुपचूप पाठलाग करताना दाखवण्यात आलंय.

हे देखील वाचा: केआरके तापसी पन्नूला म्हणाला ‘सी ग्रेड’ अभिनेत्री; ‘हसीन दिलरुबा’ सिनेमाबद्दल म्हणाला…

या शोच्या कथानकानंतर अनेक चाहत्यांनी अरविंदलाच व्हिलन ठरवलं आहे. आणि त्यामुळेच अरविंदला आता प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. मात्र आता अशा धमक्यांची सवय झाल्याचं देखील शरद केळकर या मुलाखतीत म्हणाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The family man actor sharad kelkar get death threats saying keep distance with suchi kpw

ताज्या बातम्या