बॉलिवूडमधील लोकप्रिया कपल पैकी एक म्हणजे सैफिना आहे. सैफ अली खान आणि करीना कपूरन १६ ऑक्टोबर २०१२ रोजी लग्न बंधनात अडकले. सैफीनाने जरी लग्न कमी लोकांच्या उपस्थतीत करायचे ठरवले असले तरी एकंदरीत कपूर कूटुंबाचा आकारमान पाहता हे नियोजन व्यर्थ ठरले. ‘द कपिल शर्मा शो’ च्या एका भागात सैफ ‘भूत पोलिस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. या वेळेस सैफने लग्ना बद्दलचा हा मजेशीर किस्सा सांगितला.

सोनी वाहिनीने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या एका प्रोमोमध्ये कपिलने यामी गौतमला चित्रपट निर्माता आदित्य धर सोबतच्या लग्ना विषयी प्रश्न विचारला होता, त्यावेळस तिने सांगताना दिसली, “माझ्या आजीने आम्हाला कोविडचे नियमांचे पालन करुन लग्न करायला सांगितले, त्यामुळे आमच्याकडे लग्नाला फकत २० लोक उपस्थित होते”, असे ती या प्रोमोमध्ये सांगताना दिसली आहे. यामीचे हे उत्तर ऐकल्यावर बाजूला बसलेला सैफ म्हणाला, “आम्ही जेव्हा लग्न करायाचे ठरवले तेव्हा आम्ही ठरवलं होतं की फकत कुटुंबातील जवळच्या लोकांना आमंत्रित करु, मात्र कपूर कुटुबातच किमान २०० लोक आहेत त्यामुळे ..” तसंच  त्याला महागड्या लग्नांची प्रचंड भीती वाटते कारण त्याची चार मुलं आहेत असेही तो या प्रोमोमध्ये सांगताना दिसला. सैफच्या या उत्तरामुळे सारवानाच हसू फुटल्याचे या प्रमोमध्ये पाहायला मिळते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफ सध्या ‘भूत पोलिस’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन किरपलानी यांनी केले आहे या चित्रपाटात यामी गौतम सैफ आली खान सोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, अभिनेता अर्जुन कपूर आणि जावेद जाफरी ही महत्वाच्या भूमिका साकारत आहेत.