अभिनेता रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. त्याचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. यावर काहींनी त्याला ट्रोल केले होते, तर काहींनी रणवीरला समर्थन दिले होते. या सर्व प्रकरणानंतर रणवीर सिंगच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता रणवीरने याप्रकरणी जबाब नोंदवला आहे. त्याच्याकडे असलेल्या सर्व फोटोंमधून कोणीतरी एक फोटो मॉर्फ केला आहे. ज्या पद्धतीने हे फोटो दाखवले गेले, तसे शूट झाले नसल्याचा खुलासा रणवीरने केला.

आणखी वाचा : “बॉलिवूडने मला….” ‘बाहुबली’तील शिवगामीने व्यक्त केली खंत

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये त्याच्या गुप्तांगाचा भाग दिसत असल्याने त्याच्यावर मुंबई पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. रणवीर सिंगला पोलिसांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले. रणवीरसोबत न्यूड फोटोशूटचा करार कोणत्या कंपनीसोबत झाला होता, फोटोशूट केव्हा आणि कुठे केले होते, तुम्हाला माहिती आहे का की अशा शूटमुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात, असे अनेक प्रश्न चौकशीदरम्यान त्याला विचारण्यात आले. त्यावर “व्हायरल झालेल्या फोटोंबरोबर छेडछाड करण्यात आली आहे. ज्या न्यूयॉर्कच्या मासिकासाठी हे फोटोशूट करण्यात आले होते त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंपैकी ते फोटो नाहीत” असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. तसेच “या न्यूड फोटोंचे परिणाम काय होतील हे माहित नव्हते. आपण शूटिंग दरम्यान अभिनेता म्हणून आपली भूमिका बजावली, असेही रणवीरने सांगितले,” अशी माहिती सूत्राने दिली.

हेही वाचा : “मी झूम करून पाहिलं पण…” रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर ट्विंकल खन्नाची मजेदार कमेंट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी व्हायरल झालेल्या फोटोला फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवले असून हा फोटो मॉर्फ आहे की नाही याचा तपास करण्यात येईल. या फोटोसह छेडछाड झाल्याची बाब पुढे आल्यास रणवीरला या प्रकरणात क्लिन चीट मिळण्याची शक्यता आहे.