बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी बऱ्याचवेळा एकत्र दिसतात. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा या नेहमीच सुरु असतात. कारण हे बराच वेळा डिनर डेट, ड्राइव्हसाठी बाहेर जाताना दिसतात. या दोघांनी कधी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, काल रात्री वांद्रे परिसरात गाडीत फिरत असलेल्या टायगर आणि दिशाला पोलिसांनी अडवलं होतं.
‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, टायगर आणि दिशा मंगळवारी १ जून रोजी जीममधून परत येत होते. त्याचवेळी ते वांद्रे परिसरात बॅंडस्टॅंड परिसरात दुसरी फेरी मारताना दिसले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना अडवले.
View this post on Instagram
यावेळी टायगर हा मागच्या बाजुला बसला होता तर दिशा पुढच्या बाजुला बसली होती. त्यांची गाडी थांबवल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांचे आधार कार्ड तपासले आणि अन्य औपचारिकता केल्यानंतर त्यांना सोडून दिले. करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दिशा आणि टायगरवर कारवाई करण्यात आली होती.
आणखी वाचा : “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप
दरम्यान, दिशाचा ‘राधे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यानंतर दिशा ‘एक व्हिलन २’ या चित्रपटात दिसणार आहे. तर टायगर ‘हीरोपंती २’, ‘बागी ४’ आणि ‘गणपत’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.