unknown person entered the building of kriti sanon and javed jaffrey : अनोळखी व्यक्तींकडून हाय-प्रोफाइल घरांमध्ये घुसण्याच्या घटना वाढत आहेत. वृत्तानुसार, यावेळी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पॉश परिसरातील पाली हिल येथील एका हाय-प्रोफाइल निवासी इमारतीत एका अज्ञात व्यक्तीने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला.
या इमारतीत क्रिती सेनॉन, जावेद जाफरी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आणि त्याची अभिनेत्री पत्नी अथिया शेट्टी यांसारखे मोठे सेलिब्रेटी राहतात. या इमारतीत एका अज्ञात व्यक्तीने जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे.
अशा प्रकारे त्याने लिफ्टचे केले नुकसान
इन्स्टंट बॉलीवूड पेजच्या वृत्तानुसार, तो माणूस केवळ इमारतीत घुसला नाही तर त्याने इमारतीच्या लिफ्टचेही नुकसान केले. त्याने लिफ्टमध्ये मोठे दगड ठेवले आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील चाळेही केले.
खार पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयिताची ओळख पटवली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा तो रुग्णालयात दाखल असल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत तो बरा झाल्यानंतर पुढील तपास केला जाईल.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पाली हिलच्या पॉश भागात असलेल्या ‘संधू पॅलेस’ या हाय प्रोफाइल इमारतीत परवा रात्री (१५ जुलै) उशिरा एक व्यक्ती कारने आली. त्याने सुरक्षा रक्षकाला सांगितले की त्याला १७ व्या मजल्यावर जायचे आहे. त्या मजल्याच्या मालकाने सुरक्षा रक्षकांना सांगितले होते की त्याला भेटायला येणाऱ्या कोणालाही लगेच पाठवा, त्यामुळे सुरक्षारक्षकाने त्याला आत पाठवलं. अशाप्रकारे ही अज्ञात व्यक्ती इमारतीत घुसली.
त्या माणसाने गाडी बेसमेंटमध्ये पार्क केली, तो वॉशरूममध्ये गेला. मग त्याने गार्डला १४ व्या मजल्यावर जाण्यास सांगितले. गार्डने त्या मजल्याच्या मालकाला फोन केला तेव्हा कोणीही फोन उचलला नाही. मग त्याने सांगितले की तो पुन्हा १७ व्या मजल्यावर जाईल. संशय आल्याने त्याने त्या व्यक्तीला इमारतीबाहेर काढले. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लिफ्ट बंद झाल्यानंतर ती उघडली तेव्हा त्यात मोठे दगड आढळले. लिफ्टची तोडफोड केल्यानंतर तो माणूस कॅमेऱ्याकडे पाहत अश्लील चाळेही करत होता.