अक्षय कुमारचा आगामी ‘टॉयलेट- एक प्रेमकथा’ हा सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत टॉयलेट सिनेमाची टीम या सिनेमाचे प्रमोशन करत होती. पण आता इतर कलाकारही या सिनेमाचे हटके प्रमोशन करत आहेत. नुकतेच रणवीर सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनने प्रमोशनचे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हटके व्हिडिओ शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रितेश देशमुखही म्हणतो ‘एक मराठा, लाख मराठा’

रणवीर सिंग आणि त्याच्या करामती या सर्वांनाच माहित असतात. तो कोणतीच गोष्ट शांत बसून करत नाही. तो जिथे असेल तिथे उत्साह ओसंडून वाहत असतो. एका मिनिटांच्या या व्हिडिओमध्येही तो त्याच उत्साहाने भूमी पेडणेकरच्या बाथरूममध्ये घुसतो. भूमीच्या ओरडण्यामुळे तोही जोरजोरात ओरडत देशात शौचालय कमी असल्यामुळे तो टॉयलेटचा वापर करत असल्याचे सांगितले. रणवीरने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिले की, जेव्हा तुम्हाला जायचे असेल तेव्हा हा सिनेमा पाहायला नक्की जा.

वरुण धवननेही या सिनेमाचे प्रमोशन हटके पद्धतीने केले. व्यायाम करत असताना मध्येच टॉयलेटला जाण्याासाठी म्हणून तो थांबतो पण त्याचा ट्रेनर त्याला टॉयलेटला जाऊ देत नाही. तर वरुण त्याला जाऊ न देण्याचे कारण विचारतो तेव्हा त्याचा ट्रेनर शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे तेव्हाच टॉयलेटला जा असं उत्तर देतो. अक्षय कुमारनेही सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

श्रीनारायण सिंग दिग्दर्शित ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ हा सिनेमा येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक स्वच्छ भारत अभियानावर आधारित आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan akshay kumar bhumi pednekar siddharth malhotra ranveer singh promote toilet ek prem katha on his own way
First published on: 09-08-2017 at 13:53 IST