विराट-अनुष्काची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भावभावनांचं प्रदर्शन, प्रेम आणि सर्वत्र आनंदाची उधळण करणारी ही जोडी पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. दोघेही सध्या यूकेमध्ये क्वालिटी टाईम घालवत आहेत. यूकेमध्ये गेल्यापासून ते दोघे शेअर करत असलेले फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. नुकताच दोघांचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. इतकंच नव्हे तर विराटने अनुष्कासाठी ‘ये चांद सा रोशन चेहरा’ हे गाणं गायलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अनुष्का-विराटचा हा व्हिडीओ एका साबणाच्या प्रमोशनचा आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही रोमॅण्टिक अंदाजात दिसून आले. या व्हिडीओमध्ये अनुष्का बाथरूमच्या बाहेर येताना दिसून येते. तिचा ग्लॅमरस लुक पाहून विराट कोहली पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतो आणि ‘ये चांद सा रोशन चेहरा’ गाणं गात त्यावर डान्स करताना दिसून येतोय. ‘या दिवसात लक्सने आमच्याकडून डान्स करवून घेतला’ असं लिहीत विराट कोहलीने हा व्हिडीओ शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

अनुष्का-विराट या दोघांच्या व्हिडीओवर त्यांचे फॅन्स लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. या व्हिडीओमधला अनुष्काचा लुक पाहून प्रत्येक जण तिचे दिवाने झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 मध्ये लग्न केलं. लग्नाआधी बरेच दिवस दोघेही एकमेकांना डेट करत होते. यावर्षी ते एका मुलीचे आई-वडील बनले असून मुलीचं नाव ‘वामिका’ असं ठेवलंय. अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान आणि कतरीना कैफ यांच्या ‘जीरो’ चित्रपटात ती झळकली होती. त्यानंतर तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक प्रोड्यूसर म्हणून पहिलं पाऊल टाकलंय. तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत ‘बुलबुल’, ‘पाताल-लोक’ हे चित्रपट रिलीज करण्यात आले आहेत. हे दोन्ही चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आले आहेत.