भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा अभिनेता कोण? हा प्रश्न बऱ्याचदा आपल्यासमोर येतो. सध्या बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा बोलबाला आहे. ‘पठाण’ व ‘जवान’ने तब्बल १००० कोटींहून अधिक कमाई केली. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन, थलपती विजय, यश यांचे चित्रपटही सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण तुम्हाला माहितीये का की सध्या भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वात महागडा अभिनेता यापैकी कुणीच नाहीये.

कदाचित वाचून आश्चर्य वाटेल पण १००० कोटींची कमाई करणारा शाहरुख खान व दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला मागे टाकत या सुपरस्टारचं नाव सर्वात महागडा अभिनेता म्हणून समोर आलं आहे. मीडिया रीपोर्टनुसार ७२ व्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सुपरहीट चित्रपट देणारे दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत हे सध्याचे सर्वात महागडे अभिनेते असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : मटका किंग रतन खत्रीच्या जीवनावर बेतलेला असणार नागराज मंजुळे यांचा पुढील चित्रपट; दिग्दर्शक म्हणाले…

‘जेलर’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आपल्या आगामी चित्रपटासाठी रजनीकांत यांनी तगडी रक्कम मानधन म्हणून घेतल्याचं समोर आलं आहे. आता रजनीकांत लवकरच दोन मोठे प्रोजेक्ट घेऊन येत आहेत ज्यासाठी ते १००-१५० कोटी रुपयेच नाही तर त्याहूनही अधिक मानधन घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रजनीकांत आणि लोकेश कनगराज यांच्या आगामी चित्रपटाशी संबंधित नवी माहिती समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रीपोर्टमध्ये या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी घेतलेल्या मानधनाचा उल्लेख करण्यात आला आहे. रजनीकांत यांनी ‘थलैवर १७१’साठी २६० कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप याची पुष्टी अजून झालेली नाही. जर ही बातमी खरी असे तर रजनीकांत आशियातील सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते म्हणून ओळखले जातील. याआधीसुद्धा रजनीकांत यांनी हा रेकॉर्ड मोडला आहे.

‘थलैवर १७१’मध्ये रजनीकांत यांच्याबरोबरच अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. याची निर्मिती सन पिक्चर्स करत आहे. याआधी रजनीकांत ‘जेलर’मध्ये झळकले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि याने जगभरात ६०५ कोटींची कमाई केली आहे.