नुकताच मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. दोघं नक्की कोणत्या कारणांमुळे वेगळे होतात याबद्दल अजूनतरी नीट कळू शकले नाही. पण खान कुटुंब आणि मलायका यांच्या नात्यात फार कडवटपणा आला आहे. या गोष्टीचा अंदाज नुकताच एका पार्टीमध्ये आला. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक आलोक शरद पांडे याने त्याच्या वाढदिवसाला एक पार्टी दिली होती. या पार्टीला मलायका आधीपासून हजर होती. पण जसा सलमान खान त्या पार्टीमध्ये आला, त्याला पाहून मलायका लगेच पार्टीमधून बाहेर पडली.

सलमान या पार्टीत कथित प्रेयसी लुलिया वंतूरसोबत आला होता. सलमान पार्टीमध्ये येताच, मलायका त्याला जाऊन भेटली तर नाहीच, पण सलमान आल्याचे कळताच तिने त्या पार्टीतून तिने काढता पाय घेतला. छायाचित्रकार रात्री १० वाजेपर्यंत सलमानची वाट बघत होते. त्यामुळे जसा सलमान पार्टीत पोहोचताच साऱ्यांचेच चेहरे खुलले. त्याचे फोटो घेतल्यानंतर, त्याने छायाचित्रकारांना सांगितले ‘घरी जा, जेवण करा आणि झोपा. तुम्ही खूप काम केले आहे.’

या पार्टीमध्ये मलायका फारच सुंदर दिसत होती. सदर पार्टीत सलमान व्यतिरिक्त बिपाशा बासू, करण सिंग ग्रोवर, अमृता अरोरा, लारा दत्ता, महेश भूपती, दिनो मोरिया, सैफ अली खान, करिना कपूर खान यांसारख्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

दरम्यान, येत्या २७ डिसेंबरला सलमान खान त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करणार आहे. याच दिवशी सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहे असे त्यानेच ट्विटर अकाऊंवरुन सांगितले होते. ‘२७ डिसेंबरला माझ्या अॅपचाही वाढदिवस आहे. फक्त तुमच्यासाठी’, असे ट्विट सलमानने केले आहे. सलमानने त्याच्या या अॅपबद्दल आणखीन काही माहिती दिली नसली तरीही त्याच्या वाढदिवशी चाहत्यांसाठी ही एक खास ट्रिट असणार आहे असेच म्हणावे लागेल. काही महिन्यांपूर्वी सलमान खानने त्याचा एक गेमही लाँच केला होता. या गेममध्ये चुलबूल पांडे (दबंग), प्रेम (प्रेम रतन धन पायो) आणि टायगर (एक था टायगर) या पात्रांचे अॅनिमेटेड रुप पाहायला मिळाले होते. त्यामुळे चाहत्यांच्या मनातील इच्छा ओळखून सलमान त्यांच्या मनोरंजनात कोणत्याही प्रकारची कसर बाकी ठेवत नाहीये असेच म्हणावे लागेल.