बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिश्मा मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी करिश्माने सोशल मीडियावरून चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर करिश्माने उत्तरं दिली आहेत.

करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (Ask Me Anything) द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी एका नेटकऱ्याने करिश्माला पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. याप्रश्नावर करिश्मा गोंधळलेल्या मुलीचा फोटो शेअर करत म्हणाली, विचार करेन. आता करिश्माने दिलेल्या या उत्तरामुळे सगळ्यांना प्रश्न पडला आहे की करिश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे का?

आणखी वाचा : “अमृताला खडूस नेत्रकटाक्ष…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

आणखी वाचा : ऐश्वर्या अभिषेक आणि दीपिकासोबत डान्स करताना झाली बेधुंद…, पाहा Video

करिश्माच्या लग्नाची चर्चा ही आलिया आणि रणबीरच्या लग्नानंतर सुरु झाली होती. करिश्माने त्यांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या हातात कलीरा असल्याचे दिसते. तर, पंजाबी लग्नाच्या विधींमध्ये नवरी तिच्या लग्नाच्या बांगड्यांना जोडलेले असे सोन्याचे दागिने घालते. त्यानंतर ती तिच्या बहिणी आणि मैत्रिणींच्या डोक्यावर तिचे हात हलवते आणि जर कलीरा त्यांच्यावर पडला तर तिचं पुढचं लग्न असणार असे म्हटले जाते. त्यामुळे करिश्माच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती.

आणखी वाचा : अमृता- प्राजक्तामध्ये सवाल जवाबाची जुगलबंदी, ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील नव्या लावणीची झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करिश्माने आधी व्यावसायिक संजय कपूरशी २००३ मध्ये लग्न केले होते. तिला दोनं मुलं असून मुलीचं नाव समायरा आहे तर मुलाचं नाव कियान आहे. २०१६ मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला.