News Flash

हास्यतरंग : आपली अवस्था…

वाचा भन्नाट मराठी विनोद : कारण बायको मला लसूण सोलायला लावते...

वाचा भन्नाट मराठी विनोद

जज : (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे?

नवरा : कारण बायको मला लसूण सोलायला लावते, कांदे कापायला सांगते, भांडी घासायला आणि कपडे धुवायला सांगते.

जज : मग त्यात एवढे अवघड काय आहे? लसूण थोडा गरम करून घ्या, म्हणजे सोलायला सोपा होईल. कांदे कापण्यापूर्वी ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे कापताना डोळे जळजळणार नाहीत. भांडी घासण्यापूर्वी १० मिनिटे पाण्याच्या टबमध्ये ठेवा, म्हणजे लवकर स्वच्छ होतील आणि कपडे धुण्यापूर्वी अर्धा तास सर्फमध्ये भिजत ठेवा, म्हणजे एकही डाग राहाणार नाही.

नवरा : माय लाॅर्ड, आता मला समजले. माझा अर्ज मला परत द्या.

जज : काय समजले?

नवरा : हेच की आपली अवस्था माझ्यापेक्षाही वाईट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 10:03 am

Web Title: latest funny marathi joke judge and newly married person marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : खूप वारा…
2 हास्यतरंग : ग्रीन टी…
3 हास्यतरंग : चपळ चोर…
Just Now!
X