बंता रस्त्याच्या कडेला कार लावून कारचं चाक काढत होता.

संताने विचारले, “का रे, चाक काढतोयस गाडीचं?”

बंता म्हणाला, “फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत कर. अजून एक चाक काढायचयं, तुला बोर्ड नाही दिसत का समोरचा?”

संतानं बोर्ड पाहिला… त्यावर लिहिलं होतं, ‘पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता.’