21 January 2021

News Flash

मुंबईत ७९१ नवे करोना रुग्ण, २० मृत्यू संख्या १४ हजारांच्याही वर

मुंबईत आत्तापर्यंत ३ हजार ११० रुग्णांना डिस्चार्ज

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईत ७९१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ३५५ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ११० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.

धारावीत ५७ नवे रुग्ण

धारावीत नवे ५७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील धारावीतल्या करोना रुग्णांची संख्या ९१६ झाली आहे. आत्तापर्यंत धारावीत २९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही देखील माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 8:45 pm

Web Title: 20 deaths and 791 new cases of covid19 have been reported in greater mumbai area today total number of cases rises to 14355 scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 जाणून घ्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती?
2 आंतरजिल्हा एसटी सेवेचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेऊ – परिवहन मंत्री अनिल परब
3 मला इतर पक्षांकडूनही ऑफर, करोना संकट संपल्यानंतर निर्णय घेणार – एकनाथ खडसे
Just Now!
X