लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली वातानुकू लित लोकल सेवा १५ ऑक्टोबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या लोकलच्या दिवसभरात १० फेऱ्या होतील, अशी माहिती दिली. महत्वाची बाब म्हणजे प्रवासादरम्यान करोनाचा फैलाव झपाट्याने होऊ नये म्हणून वातानुकूलित लोकल बंद ठेवली होती. सध्या मुंबईत रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असतानाही वातानुकूलित लोकल चालवण्याचा ‘धाडसी’ निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

१५ ऑक्टोबरपासून एकू ण १९४ लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. यामध्ये सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. वातानुकूलित लोकलच्या महालक्ष्मी ते बोरीवली आणि बोरीवली ते चर्चगेट अशा दोन फेऱ्या धीम्या मार्गावर होतील. तर चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट अशा अप-डाऊन मार्गावर मिळून आठ जलद लोकल फेऱ्या होणार आहेत. यातील काही फेऱ्या गर्दीच्या वेळीही असतील. टाळेबंदीआधी वातानुकूलित लोकलच्या दिवसभरात बारा फेऱ्या होत होत्या.

यातील सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी असलेल्या तीन ते चार फेऱ्यांना गर्दी होत होती. आताही गर्दीच्या वेळी प्रतिसाद मिळाल्यास त्यात सामाजिक अंतर कसे राहिल, वातानुकूलित यंत्रणेचे तापमान नियंत्रणात राखता येईल का असे प्रश्न आहेत. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी, सध्या मेल-एक्स्प्रेस धावत असून त्यातही वातानुकूलित डबे आहेत. यातूनही प्रवासी प्रवास करत असून यामधील वातानुकूलित यंत्रणेचे तापमान नियंत्रणात असते. त्याचप्रमाणे वातानुकूलित लोकलमधील तापमान नियंत्रणात ठेवले जाईल. ही लोकल सॅनिटायजही केली जाणार आहे. प्रवासीही मास्क घालून खबरदारी घेऊन प्रवास करतील,असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान एकू ण होणाऱ्या १९४ लोकल फेऱ्यांमध्ये ५१ फेऱ्या चर्चगेट ते विरार दरम्यान, बोरीवली ते चर्चगेट दरम्यान ९६, भाईंदर ते विरार दरम्यान ९ फेऱ्या, नालासोपारा ते चर्चगेट दरम्यान १२ फेऱ्या, चर्चगेट ते भाईंदर दरम्यान ९, वसई रोड ते चर्चगेट दरम्यान २ फेऱ्या, वांद्रे ते बोरीवली दरम्यान ८ आणि चर्चगेट ते वांद्रे दरम्यान ८ फेऱ्या होणार असल्याचे सांगितले. सध्या पश्चिम रेल्वेवर ५०६ लोकल फेऱ्या होत होत्या. नवीन फेऱ्यांची भर पडणार असल्याने एकूण फेऱ्यांची संख्या ७०० होणार आहे.

मध्य रेल्वेही लोकल फेऱ्या वाढवणार
लोकल फे ºयांची कमी संख्या, वाढत जाणारे प्रवासी आणि होणारी गर्दी पाहता उच्च न्यायालयाने फे ºयांची संख्या प्रत्येकी ७००पर्यंत वाढवण्याच्या सूचना के ल्या होत्या. त्यानुसार पश्चिम रेल्वेने नविन फे ºयांची भर पाडताना मध्य रेल्वेनेही लोकल फे ºयांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दरदिवशी ४५३ फे ºया मध्य रेल्वेवर होतात. या फे ºया आणखी ७०० पर्यंत वाढवण्यात येतील आणि लवकरच त्याची माहिती दिली जाईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. त्यानुसार २४७ फे ºयांची भर पडणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीची प्रवासी क्षमता ५ हजार ९६४ आहे. १ हजार २८ प्रवासी आसनक्षमता आणि उभ्याने ४ हजार ९३६ प्रवासी प्रवास करु शकतात. टाळेबंदीआधी दररोज होणाऱ्या बारा फेऱ्यांमधून सरासरी १८ हजार प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे आता वातानुकू लित लोकल गाडीला तेवढाच प्रतिसाद मिळेल की त्यापेक्षा कमी असा प्रतिसाद असेल हे पहावं लागणार आहे.