News Flash

केंद्रांवरील लशीचा साठा निर्धारित करण्याचे पालिकेचे आदेश

लसीकरण सुरळीत करण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना

(संग्रहित छायाचित्र)

लसीकरण सुरळीत करण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना

मुंबई : लशीचा अनियमित साठा आणि नागरिकांचे होणारे हाल यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. यानुसार प्रत्येक केंद्रावरील लससाठा आणि कक्षांची संख्या निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. ज्येष्ठ आणि अपंगांसाठी काही केंद्रांवर नोंदणीसह लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

शहरात लसपुरवठा नियमित होत नसल्याने प्रत्येक प्रभागांत सुरू केलेल्या केंद्रावर लस मिळत नाही. त्यामुळे येथे लसीकरण स्थगित करण्याची वेळ आली. तसेच अनेक केंद्रांवर नोंदणी आणि वेळ आरक्षित करूनही पुरेसा साठा नसल्याने नागरिकांना लस न घेताच परतावे लागत आहे.  प्रत्येक प्रभागात एक केंद्र कार्यान्वित राहण्यासाठी आणि लससाठा उपलब्ध होण्यासाठी पालिकेने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. केंद्रावर उपलब्ध असलेल्या लशीच्या मात्रांनुसार लसीकरण केंद्रांची किमान किंवा कमाल वेळ निश्चित करावी. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लससाठा व लाभार्थ्यांच्या संख्येनुसार कक्षांची संख्या निर्धारित करावी. केंद्रावरील मनुष्यबळाचा पूर्णपणे वापर करून घेण्यासाठी प्रतिदिन प्रतिकक्ष किमान १०० मात्रा उपलब्ध करून द्याव्यात, असे यात नमूद केले आहे. १८ वर्षांवरील सर्वासाठी नोंदणी करणे पालिकेने बंधनकारक केले होते. मात्र यात काही बदल केल्याचे स्पष्ट केले.

यांना थेट लस मिळणार..

खालील गटातील व्यक्तींना राहत्या प्रभागाच्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर थेट लसीकरणाची सुविधा उपलब्ध असेल. नोंदणी किंवा वेळ आरक्षित न करता या व्यक्तींना सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी लस घेता येईल.

* ६० वर्षांवरील दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी

* कोव्हॅक्सिन लशीच्या दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी

* शारीरिकदृष्टय़ादुर्बल असलेले किंवा अपंग असलेल्या व्यक्ती

* गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तिन्ही दिवशी सर्व केंद्रांवर नोंदणी आणि वेळ आरक्षित करूनच लसीकरण केले जाईल. रविवारी लसीकरण बंद असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 2:36 am

Web Title: bmc order to fixed the stock of vaccine at the centre zws 70
Next Stories
1 प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करू नये!
2 रेल्वेमार्गातील पूरस्थितीवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष
3 ड्रीम्स मॉलमधील अग्नितांडव : अहवाल परस्पर प्रसारमाध्यमांना मिळाल्याने नगरसेवकांचा संताप
Just Now!
X