News Flash

कांद्याचे दर घसरल्याने निर्यातीस परवानगीची मागणी

केंद्र सरकारने आणखी कांदा आयात केला असून तो १५ जानेवारीच्या सुमारास बाजारात येईल.

(संग्रहित छायाचित्र)

 

कांद्याचे दर घसरल्याने निर्यातीस परवानगी देण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने दर घसरत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.

मुंबईसह ठाणे जिल्हा, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्य़ांमध्ये कांद्याचे किरकोळ बाजारातील दर ४०-६० रुपये प्रति किलोपासून असून नवीन कांदा या दराने उपलब्ध होत आहे. घाऊक बाजारात दररोज सुमारे

दोन लाख क्विंटल कांदा उपलब्ध होत असून नोव्हेंबरच्या तुलनेत हे प्रमाण तिपटीने वाढले असल्याचे पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

घाऊक बाजारात दर कमी असून व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे किरकोळ बाजारात अजूनही काही ठिकाणी कांद्याचे दर चढेच आहेत. केंद्र सरकारने आणखी कांदा आयात केला असून तो १५ जानेवारीच्या सुमारास बाजारात येईल.

हे लक्षात घेऊन कांद्याचे दर आणखी घसरण्याची भीती आहे. त्यामुळे आता निर्यातीवरील बंदी उठवून आयात रोखण्यात यावी, अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:36 am

Web Title: demand for permission for export due to falling onion prices abn 97
Next Stories
1 ‘मनसे’ पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार?
2 आमचे मासे त्यांच्या गळाला लागणार नाहीत : राऊत
3 खैरे – सत्तार वादावर, संजय राऊत म्हणतात…
Just Now!
X