News Flash

बेळगावमध्ये संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल

बेळगावमध्ये अचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी भिडे (संग्रहित छायाचित्र)

बेळगावमध्ये अचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावच्या येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र मैदानावर बोलताना प्रक्षोभक विधान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान हे देशातील अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान आहे. या मैदानाला तोड नसून त्या माजी आमदाराला हे मैदान उद्धवस्त करायचे होते. त्याला त्याची जागा दाखवून द्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन मराठी बाणा दाखवा असे विधान त्यांनी केले.

या सर्व विधानांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरुनच बेळगाव पोलिसांनी संभाजीराव भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याआधी कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पण त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चीट देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2018 9:25 pm

Web Title: fir against sambhaji bhide
Next Stories
1 आमच्या मुलींना न्याय मिळणारच, गुन्हेगारांना सोडणार नाही – नरेंद्र मोदी
2 राहुल गांधी तुम्ही सुद्धा बलात्काऱ्याचे समर्थन केले होते – स्मृती इराणी
3 लहान मुलांना धर्म नसतो, काँग्रेसकडून द्वेषाचे राजकारण: कठुआ प्रकरणावर भाजपाने सोडले मौन
Just Now!
X