संचमान्यतेतील बदलांचा शासन निर्णय जारी

संचमान्यतेसंदर्भात २८ ऑगस्ट २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील हजारो मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची पदे रद्द होणार होती. शासनाच्या या निर्णयाला सर्वस्तरतून कडाडून विरोध झाल्यानंतर तो बदलून नवीन निर्णय जारी करत शासनाने राज्यभरातील हजारो पदे अतिरिक्त होण्यापासून थांबविले आहे.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाप्रमाणे शाळांमधील संरचनात्मक बदल झाला असून इयत्ता १ ते ५ वी प्राथमिक, ६ ते ८ वी उच्च प्राथमिक व ९ ते १० वी माध्यमिक विभाग झाला आहे. शाळेतील पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक तसेच मुख्याध्यापक पद मंजूर करतांना पूर्वी ५ वी ते १० वीचे वर्ग ग्राह्य धरले जात होते. परंतु आताचे संचमान्यतेचे नियम बदलल्याने ५ वीचे वर्ग ही पदे मंजूर करण्यासाठी ग्राह्य न धरल्याने राज्यातील शाळांमधील हजारो उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकाची पदे रद्द होत होती. ही बाब आमदार रामनाथ मोते यांनी शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिली व संचमान्यतेत बदल करण्याची मागणी केली. त्यानुसार संचमान्यतेत बदल करण्यात आला असून उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकाचे पद मंजूर करतांना इयत्ता ५ वीचा वर्गही ग्राह्य धरला जाणार आहे. आमदार रामनाथ मोतेंनी केलेल्या मागणीमुळे व शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शाळांमधील शेकडो शिक्षकांची पदे अतिरिक्त होण्यापासून वाचणार असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.