News Flash

रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबईत दिवसभरात १,१६७ बाधित

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईसह राज्यात बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली. राज्यात दिवसभरात करोनाचे ८,८०७ नवे रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील १,१६७ जणांचा समावेश आहे.

गेल्या आठवडय़ात नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्य़ांमध्ये रुग्ण वाढले होते. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नगर, जळगाव, नागपूर, अमरावती या जिल्ह्य़ांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्येत अडीच हजारांनी वाढ झाली आहे.

गेले दोन दिवस मुंबईतील रुग्णसंख्येत घसरण नोंदविण्यात आली होती. मात्र, बुधवारी तब्बल १,१६७ मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याची नोंद होताच यंत्रणांचे धाबे दणाणले. करोना वाढीचा दर ०.२४ टक्क्य़ांवर पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे. रुग्णसंख्या आणखी दोन-तीन दिवस अशीच वाढल्यास राज्य सरकारला कठोर निर्बंध लागू करण्यासाठी पावले उचलावी लागतील, असाच सूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी उमटला.

राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे..

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्य़ातील पोहरादेवी या धार्मिक स्थळी शक्तिप्रदर्शन केले. या वेळी सारे नियम धुडकावून राठोड यांच्या समर्थकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी के ली. या घटनेनंतर वाशिम जिल्ह्य़ात  दोन दिवसांत ८९ वरून रुग्णसंख्या ३१५ झाली.

मंत्रालयातील कर्मचारी एक दिवसाआड कामावर

मुंबई : प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची विभागणी एक दिवसाआड, तीन- तीन दिवस किंवा एक- एक आठवडय़ाच्या पाळीनुसार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:01 am

Web Title: large increase in the number of patients in the state abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्यातील ४.३ टक्के लसमात्रा वाया
2 मराठी ग्रंथालयांना बालवाचकांची प्रतीक्षा
3 डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत उत्तर दाखल करा!
Just Now!
X