मुंबई येथून सुटणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांच्या वेळापत्रकामध्ये रेल्वे प्रशासनाने बदल केले असून हे बदल १ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस दुपारी ४.४० ऐवजी ४.३५ वाजता, वसई रोड येथून सुटणारी निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस रात्री ३.४० ऐवजी ३.१५ वाजता व बिकानेर-कोयम्बतूर सुपरफास्ट एसी एक्स्प्रेस रात्री ३.४० ऐवजी ३.१४ वाजता सोडण्यात येणार आहे. सीएसटीहून सुटणारी तपोवन एक्स्प्रेस सकाळी ६.१५ ऐवजी ६.१० वाजता, नांदेड येथून सुटणारी तपावन एक्स्प्रेस सकाळी १०.१० ऐवजी १०.३० वाजता, सीएसटीहून सुटणारी देवगिरी एक्स्प्रेस रात्री ९.१० ऐवजी रात्री ९.०५ वाजता, लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटणारी कर्मभूमी एक्स्प्रेस (२२५११) सकाळी ११.३० ऐवजी सकाळी ११.२५ वाजता, सीएसटीहून सुटणारी इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ६.४० ऐवजी सकाळी ६.४५ वाजता, छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन सुटणारी सोलापूर एक्स्प्रेस रात्री ९.२० ऐवजी रात्री ९.१५ वाजता, मालेगाव एक्स्प्रेस रात्री १० ऐवजी रात्री ९.१० वाजता, भुसावळ पॅसेंजर सकाळी ५.२५ ऐवजी सकाळी ५.२० वाजता सोडण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2014 रोजी प्रकाशित
लांबपल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल
मुंबई येथून सुटणाऱ्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांच्या वेळापत्रकामध्ये रेल्वे प्रशासनाने बदल केले असून हे बदल १ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
First published on: 31-08-2014 at 04:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Long route railway time table changed