News Flash

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री…”

मुंबईत पत्रकारांशी बोलताना मांडलं मत

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. या मुलाखतीचा मूळ हेतू राज्यातील विरोधकांना धमकावण्याचाच आहे, असा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. तशातच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईत पत्रकारांशी बोलताना एक इशारा दिला.

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत अतिशय आक्रमक भाषेचा वापर केला. आडवं येणाऱ्यांना आडवं पाडून महाराष्ट्र पुढे जाईल, अशाप्रकारची वक्तव्यं करून त्यांनी विरोधकांना चेतावणी दिली. या साऱ्या प्रकारानंतर यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मांडलं. “महाविकास आघाडीचं सरकार हे सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिलेले नाहीत. याच्यामागे हात धुवून लागू, त्याची खिचडी करू, याचा खिमा करू अशी भांडणं नाक्यावर होतात. असं बोलणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. कारण चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात फार काळ टिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी शब्द संयमाने आणि जपून वापरावे”, असा इशारा फडणवीसांनी दिला.

ED, CBI ची कुत्र्यांशी तुलना; संजय राऊतांनी कार्टून केलं ट्विट

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री या पदाचा मान राखायला हवा. त्यांना माझा सल्ला आहे की मुख्यमंत्र्यांसारखे वागा. पदाला साजेसा संयम ठेवा आणि तो तुमच्या कृतीतून दिसू द्या. मुख्यमंत्र्यांची मुलाखतीत विकासावर चर्चा झालीच नाही. संपूर्ण मुलाखत टीका टिपण्णीमध्ये गेली. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला शोभणारी ती वक्तव्यं नव्हती. माझं असं प्रामाणिक मत आहे की उद्धव ठाकरे यांनी पाच वर्ष नक्की राज्य चालवावे पण नुसत्या धमक्या नकोत. त्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचं राज्य आणा”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 1:15 pm

Web Title: maharashtra cm uddhav thackarey slammed by devendra fadnavis angry slams him for arrogant language in interview by sanjay raut vjb 91
Next Stories
1 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार का?, फडणवीस म्हणतात…
2 विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना तडाखा
3 लहान मुलांना लोकल प्रवासास मनाई
Just Now!
X