मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आरोह वेलणकरला महेश टिळेकर यांनी पुन्हा एकदा सुनावलं आहे. अमृता फडणवीस यांच्यावर महेश टिळेकर यांनी टीका केली होती. त्यानंतर आरोह वेलणकरने त्यांना उत्तर दिलं होतं. हा वाद संपतो न संपतो तोच आरोह वेलणकरने ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीबाबत झालेल्या मुलाखतीवर टीका केली. त्यावर आता महेश टिळेकरांनी फेसबुक पोस्ट लिहून त्याला खरमरीत उत्तर दिलं आहे. महेश टिळेकरांनी आरोह वेलणकरसारख्या मराठी भय्यांना मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार काय असाच प्रश्न विचारला आहे.

काय म्हणाला आहे आरोह वेलणकर?
Finally आज अख्खी मुलाखत पाहायचा योग जुळून आला. सर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. फोडणी, खिचडी, मसाला नको. मला एक तरुण म्हणून आपला महाराष्ट्र कसा घडवणार ते सांगा? यात जास्त रस आहे. असं ट्विट आरोहनं केलं.

महेश टिळेकरांनी आरोह वेलणकरला काय सुनावलं?

Aroh Welankar आरोह वेलणकर बापाला….शिकवू नको. तरुण म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कसा घडवणार हे विचारतोय तू..तुझ्यात हिंमत असेल तर या देशातील तरुण म्हणून देशाच्या पंतप्रधान मोदींना प्रश्न विचार ना की देश कसा घडवणार आहेत ते? लघुउद्योग बुडाले, तरुणांना रोजगार नाही, मोठे उद्योगपती बँकेला चुना लावतात, शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागतं, दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. हे सगळं पाहून देश कसा घडणार हे तुझ्या सारख्या बेअक्कल तरुणाला कळत नाही का ? की वडील भाजपा पदाधिकारी आणि काका भाजपा प्रवक्ते म्हणून सोयीप्रमाणे डोळेझाक करतोय? मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याआधी तू तरुण म्हणून या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं आहे ते तरी सांग आधी ? परराज्यातून आलेल्या अमराठी लोकांचे तळवे चाटणाऱ्या मराठी.. तुझ्या सारख्या मराठी भय्यांना काय अधिकार मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा? स्वतःची लायकी न पाहता नको तिथे स्टंट करत राहिला तर तुला खिमा,मसाला,खिचडी पण खायला मिळणार नाही.तेंव्हा वडा पाव किंवा १० रुपयांतील सरकारी जेवण थाळी उपयोगाला येईल. स्वतःचे आणखी वस्त्रहरण करून घ्यायचे नसेल तर तुझ्यात नसलेला अभिनय कसा सुधारता येईल याकडे लक्ष दे.
जय महाराष्ट्र!