मुंबई : यंदाच्या रविवारी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बरवर पनवेल ते वाशी, नेरुळ, बेलापूर ते खारकोपरदरम्यान दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहिमदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असल्याचे रेल्वेने सांगितले. मध्य रेल्वे मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरील लोकल फे ऱ्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे : कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग

कधी : स. ११.२० ते दु. ३.५० वा.

परिणाम : ब्लॉकमुळे अप जलद मार्गावरील लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. ठाणेनंतर पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाणे ते सीएसएमटीदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकांत थांबतील.

हार्बर मार्ग

कुठे: पनवेल ते वाशी, नेरुळ, बेलापूर ते खारकोपरदरम्यान दोन्ही मार्गावर

कधी: स. ११.३० ते दु. ४.००

परिणाम: पनवेल, बेलापूरहून सीएसएमटीसाठी आणि वाशीहून पनवेल, बेलापूरसाठी सुटणाऱ्या लोकल वाशी ते पनवेलदरम्यान, तर पनवेल ते अंधेरी, ठाणे ते पनवेलदरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फे ऱ्या रद्द राहतील. ठाणे ते वाशी, नेरुळ लोकल फेऱ्या मात्र सुरूच राहणार आहेत. बेलापूर, नेरुळ ते खारकोपरदरम्यानही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे

कुठे: मरिन लाइन्स ते माहिमदरम्यान डाऊन धिमा मार्ग

कधी:  स. १०.३५ ते दु. ३.३५ वा.

परिणाम: बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल मरिन लाइन्स ते माहिमदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. महालक्ष्मी, प्रभादेवी व माटुंगा स्थानकात डाऊन धिम्या मार्गावर लोकल गाडय़ा थांबणार नाहीत.