27 September 2020

News Flash

झेंड्याला विरोध करणाऱ्यांना मनसेचं खणखणीत उत्तर

मनसेच्या या झेंड्याला अनेक स्तरातून विरोध करण्यात आला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवमुद्रा असलेल्या नव्या भगव्या झेंड्याचं आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याहस्ते अनावरण करण्यात आलं. मनसेच्या या झेंड्याला अनेक स्तरातून विरोध करण्यात आला होता. मनसेकडून आता यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. “काही लोकांनी राजमुद्रेवरून विरोध केला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना जसं तुम्ही आदर्श मानता, तसं आम्हीही आदर्श मानतो,” असं मत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं.

“आता भगवा ध्वज आसमंतात दुमदुमेल. सर्वांपर्यंत भगवा पोहोचवण्यासाठी सर्वप्रथम झेंड्याचं अनावरण करण्यात आल्याचं नांदगावकर म्हणाले. विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा असं आमचं घोषवाक्य आहे. आम्ही भगवा झेडा हाती घेऊन पुढे निघालो आहोत,” असंही नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.

मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेने याआधी अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवला होता. त्याआधीपासून मनसे झेंडा बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र ट्विटरवर बदल केल्यानंतर तसे संकेत मिळाले होते. पक्षाच्या आधीच्या झेंड्यात निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून चार रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग आहे. तसंच भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 11:15 am

Web Title: mns leader bala nandgaonkar clarification about new flag maha adhiveshan live jud 87
Next Stories
1 भविष्याला संघर्षाचं ओझं वाटत नाही; शिवसेनाप्रमुखांना मनसेचं अभिवादन
2 मनसेच्या स्टेजवर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा
3 Maha Adhiveshan गोरेगाव येथील नेस्को मैदानावर राज गर्जना
Just Now!
X