मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडांमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचे सत्र सुरुच आहे. सायन – माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधून सुटणाऱ्या लोकल ट्रेन विलंबाने धावत असून यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
लोकल ट्रेन सुमारे २० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ जाईल असे समजते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2019 10:48 pm