रेल्वे मार्ग, सिग्नल आणि ओव्हरहेडविषयक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी रविवार, १७ जून रोजी पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या काळात जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर कामांसाठी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

शनिवारी मध्यरात्री ब्लॉक

दिवा स्थानकात पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असून यासाठी शनिवार, १६ जून रोजी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. या ब्लॉकमुळे लोकल तसेच लांबपल्ल्याच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. डाऊन धिम्या मार्गावर मध्यरात्री १.४५ ते पहाटे ५, अप धिम्या आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १२.४५ ते सकाळी ६.२५, तर अप जलद मार्गावर मध्यरात्री १.४५ ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत ब्लॉकचे काम चालेल.

१६ जून रोजी धावणारी ट्रेन भुसावळ-मुंबई पॅसेंजर आणि १७ जून रोजी धावणाऱ्या ट्रेन मुंबई ते भुसावळ पॅसेंजर ट्रेन,  पुणे ते मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस आणि ट्रेन मुंबई ते पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ’ कधी : रविवार, १७ जून, स. १०.३५ ते दु.३.३५ वा.
  • कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे
  • कधी : रविवार, सकाळी ११.४० ते दुपारी ४.१०