विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदारांच्या शपथविधीकरिता चार दिवसांचे पहिले अधिवेशन होईल हे गृहीत धरून विधिमंडळ सचिवालयाने सारी तयारी करीत बाहेर मंडप आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारीही केली होती. पण राष्ट्रपती राजवट लागू झाली तरीही लवकरच कधीही अधिवेशन होईल या आशेवर केलेली तयारी कायम ठेवण्यात आली आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान विधान भवनाच्या बाहेर सुरक्षेसाठी सारे उपाय योजावे लागतात. निकालानंतर अधिवेशन होईल हे गृहीत धरून सारी तयारीही विधिमंडळ सचिवालयाने केली होती.

राष्ट्रपती राजवट लागू होऊन चार दिवस उलटले तरीही अधिवेशनाकरिता करण्यात आलेली सारी तयारी कायम ठेवण्यात आली आहे. याचे भाडे मात्र विधिमंडळ सचिवालयाला भरावे लागत असणार.