20 January 2021

News Flash

फुकटय़ांकडून एक कोटीचा दंड वसूल

पश्चिम रेल्वेवर २५ हजार ९०० विनातिकीट प्रवासी

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : लोकल प्रवासांवर मर्यादा असतानाही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत वाढ होत असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने तब्बल २६ हजार प्रवाशांकडून सात महिन्यांच्या काळात एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

तिकीट तपासणी, रेल्वे सुरक्षा दलाला घेऊन नियमित तपासणीबरोबरच विशेष तपासणी मोहीमही हाती घेण्यात आल्या. या वेळी एकूण २५ हजार ९८२ प्रवासी विनातिकीट आढळले. यात १९ हजार १७२ प्रवासी उपनगरीय मार्गावर आढळले असून त्यांच्याकडून ५५ लाख रुपये दंड वसूल केला गेला आहे, तर ६ हजार ८१० प्रवासी मेल-एक्स्प्रेस मार्गावर सापडले आहेत. यामध्येही ऊर्वरित दंड वसूल केला आहे. याशिवाय बनावट ओळखपत्र बाळगून लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. मे ते नोव्हेंबर या काळात हा दंड वसूल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 3:10 am

Web Title: recovered one corer fine from without ticket travelers dd70
Next Stories
1 करोना लशीसाठी कांजूरमध्ये शीतगृह
2 वडाळ्यातील बेकायदा मंदिरावर कारवाईचे आदेश
3 ट्रॉम्बेतील संघटित टोळीला ‘मोक्का’
Just Now!
X