अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारत दौऱ्यावर आलेले आहेत. एकीकडे ट्रम्प यांचे भारताकडून जोरदार स्वागत सुरू असताना दुसरीकडे शेअर बाजारात साधारण दोन टक्के घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शेअर बाजारावर ‘करोना’ चे पडसाद उमटल्याचे दिसत आहेत. सेन्सेक्समध्ये ८०६.८९ अंकाची (१.९६ टक्के) घसरण होवून तो ४०,३६३.२३ अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीतही २५१.४५ अंकांची(२.८टक्के) घसरण होवून तो ११,८२९.४० अंकांवर बंद झाला. शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद ठेवण्यात आलेला होता.

टाटा स्टीलममध्ये ५.३६ टक्के घसरण झाली. त्यापाठोपाठ ओएनजीसी, मारुती, टायटन, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागला.

या आठवड्याच्या अखेरीस तिसऱ्या तिमाहीची जीडीपीची आकडेवारी जाहीर होणार असुन, मंदीचा प्रभाव पाहता विकासदर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  जगभरातील बाजारपेठेवर करोनाचा परिणाम जाणवत आहे. चीन नंतर दक्षिण कोरियामध्ये ‘करोना’चा संसर्ग वाढला आहे. परिणामी दक्षिण कोरियामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे.