सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईकरांसाठी आणि राज्यातून तसेच देशभरातून येणाऱ्या भक्तांचे महत्त्वाचे स्थान आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सिद्धिविनायक मंदिरात महिलांच्या अथर्वशीर्षपठणाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल सहभागी होणार आहेत. त्यांच्या मागे इतर महिला अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांना कार्यक्रमाच्या आधी ८ वाजता उपस्थित राहणे गरेजेचे आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या मंडपात महिलांसाठी बैठक व्यवस्था, टीव्ही स्क्रीन, स्पिकर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबईतील इतर मोठ्या मंडळांनी आपापल्या ठिकाणी दाखवावे असे आवाहन करण्यात येणार आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास आणि सर्व विश्वस्त मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे ज्या महिला याठिकाणी उपस्थित राहू शकणार नाहीत त्या या पठणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 13, 2018 5:57 pm